Crime : 25 वर्षीय फळविक्रेत्याची निर्घृण हत्या; हत्या करुन मृतदेह रस्त्याकडेला फेकला

जालना शहरामधील एका 25 वर्षाच्या फळविक्री करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली असून या हत्येनंतर आरोपींनी फळविक्रेत्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
Crime : 25 वर्षीय फळविक्रेत्याची निर्घृण हत्या; हत्या करुन मृतदेह रस्त्याकडेला फेकला
Crime : 25 वर्षीय फळविक्रेत्याची निर्घृण हत्या; हत्या करुन मृतदेह रस्त्याकडेला फेकलाSaam TV

जालना : जालना शहरामधील एका 25 वर्षाच्या फळविक्री करणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवाय हत्येनंतर आरोपींनी फळविक्रेत्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा घटना आज सकाळी उघडकीस आली असून भरत मुजमुले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शहरातील डबलजीन भागात ही घटना घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी आज भल्या पहाटे ही हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Crime : 25 वर्षीय फळविक्रेत्याची निर्घृण हत्या; हत्या करुन मृतदेह रस्त्याकडेला फेकला
धक्कादायक : रेती माफियांनी घरात घुसून पाजलं तरुणाला विष; तरुणाची प्रकृती गंभीर

दरम्यान, फळविक्री करणाऱ्या तरुणाची अज्ञाताने हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची माहिती मिळाल्यानंतर कदीम जालना (Jalna) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या हत्येमागील कारण अजून अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्येप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com