Indapur Fire News: इंदापूरात अग्नितांडव! सतत आग लागण्यामागे कारण काय?

सातत्याने असे प्रकार घडत असल्याने नागरिकामधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Indapur Fire News
Indapur Fire NewsSaam TV

मंगेश कचरे

Indapur News: इंदापूर येथून आगीचे मोठे वृत्त समोर आले आहे. शहरात नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग लागली आहे. पुणे जिल्ह्यात इंदापूर शहरातील ज्योतिबा माळ परिसरातील इंदापूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोला शनिवारी रात्री उशिरा आग लागली. (Fire News)

या आधी देखील येथे अशाप्रकारची मोठी आग (Fire) लागली होती. आता पुन्हा एकदा आग लागल्याचा प्रकार घडला आहे. सातत्याने असे प्रकार घडत असल्याने नागरिकामधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Indapur Fire News
Mumbai Fire News: मुंबईत अग्नितांडव! वांद्र्यात झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

भायखळ्यातील घोडपदेव परिसरात भीषण आग; चार घरे भस्मसात

५ दिवसांपूर्वी मुंबईतील भायखळा येथील घोडपदेव परिसरात भीषण आग लागली होती. घोडपदेवमधील हारुसिंग शोभराज चाळीतील आगीत चार घरे भस्मसात झाली आहेत. चाळकऱ्यांना तात्काळ घराबाहेर काढल्याने जीवितहानी टळली.

शॉर्ट सर्किटने घराला लागली आग

अधिक दाबाच्या विजेमुळे शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागल्याची मोठी दुर्घटना समोर आली आहे. यात घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे ही घटना घडली. कैलास भजन वासनिक (४८) असे पीडित घरमालकाचे नाव आहे.

Indapur Fire News
Kalyan Crime News: इन्स्टाग्रामवरील कमेंटवरून वाद, अल्पवयीन मुलाला अर्धनग्न करून मारहाण; जमिनीवर नाक घासायला लावलं

गावामध्ये कमी अधिक दाबाचा वीजपुरवठा सुरू होता. घटनेच्या वेळी कैलास यांची पत्नी व मुलगा शेत शिवारात गेले होते. घरानजीक कार्यक्रम घरातील टीव्ही होम थिएटर व अन्य साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. दरम्यान, घरात अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. घरातील साहित्य जळू लागले. घराजवळ खेळत असलेल्या मुलांना घरातून धूर निघताना दिसल्याने त्यांनी आरडाओरड करून घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.

नागरिकांनी धाव घेऊन वीजपुरवठा खंडित करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, यामध्ये वासनिक यांच्या घरातील विद्युत उपकरणांसह काही साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत त्यांचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून कैलास वासनिक यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com