...तर लाखो गुन्हे दाखल होतील, लोकलचं उदाहरण देत आव्हाडांच्या विनयभंग प्रकरणावर भुजबळ स्पष्टच बोलले

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत भाष्य केलं आहे
chhagan bhujbal news
chhagan bhujbal news saam tv

भूषण शिंदे

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना काल मंगळवारी विनयभंग प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. आव्हाडांकडून झालेला प्रकार विनयभंगामध्ये मोडतो का ? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

'लोकलमध्ये हजारो महिला पुरुष प्रवास करतात, यामध्ये अनेकांना रोज धक्का लागतो. अशावेळी तर दररोज लाखो गुन्हे दाखल होतील ? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.

chhagan bhujbal news
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, नुसतं कुणाला हात लावून बाजूला करणे हा विनयभंग होत असेल तर लोकलमध्ये हजारो महिला पुरुष प्रवास करतात यामध्ये अनेकांना रोज धक्का लागतो अशावेळी तर दररोज लाखो गुन्हे दाखल होतील असे सांगत आमच्याविरुद्ध देखील चुकीच्या पद्धतीने यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहे ही बाब अतिशय चुकीची आहे'.

'आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली कारवाई शेवटी सरकारवरच उलटली आहे. तसेच कुठल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा आहे, असेही भुजबळ म्हणाले.

chhagan bhujbal news
Sanjay Nirupam : काँग्रेस नेते संजय निरुपम मुंबई पोलिसांच्या ताब्यात; काय आहे प्रकरण?

सिडकोचे कार्यालय हलवण्यामागे नेमका हेतू काय ? : छगन भुजबळ

नाशिक मधील सिडकोचे कार्यालय हलविण्यात येणार आहे. त्यावरून छगन भुजबळांनी राज्य सरकारला प्रश्न केले आहेत. 'नाशिक मधील सिडकोचे कार्यालय हलवण्यामागे नेमका हेतू काय ? असा सवाल उपस्थित करत राज्य शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करत नाशिकमध्ये सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवावे. त्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी देखील पूर्ववत कायम ठेवण्यात यावेत. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे ,अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com