Bachchu Kadu News: तुम्ही गद्दार आहात; आजोबांनी बच्चू कडूंना गाडी अडवून झाप झाप झापलं... पाहा व्हिडीओ

अर्जुन भगवान घोगरे असं 80 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam TV

>> कैलास चौधरी

धाराशिव : बच्चू कडू यांची सर्वसामन्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे नेते अशी ओळख आहे. यामुळेच बच्चू कडूंची लोकप्रियता खूप जास्त आहे. मात्र 80 वर्षाच्या आजोबांनी बच्चू कडू यांना कोर्टातून बाहेर येताना अडवून आपण जनतेसोबत गद्दारी केली. आपण गद्दार आहात असं थेट म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Political news)

अर्जुन भगवान घोगरे असं 80 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. कोर्टाच्या आवारातच या व्यक्तीने बच्चू कडू यांच्या गाडीच्या समोर जात गाडी अडवून धरली. आपण गुंडांसोबत गेलात असं त्यांनी बच्चू कडू यांना म्हटलं. यावेळी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना या आजोबांना अनेकदा बाजूला केले पण ते आपलं म्हणणं ठामपणे मांडत होते.

Bachchu Kadu
Arvind Sawant On Ashish Shelar: 'ट्विट करताना घेतली होती का?' अरविंद सावंत यांची आशिष शेलारांवर टीका

काय वागत आहात तुम्ही. आम्ही तुम्हाला सत्ता दिली नीट वागा. बच्चू कडूंना ज्या धोरणानं, ज्या आशेनं निवडून दिलं तसं ते वागत नाहीत. बच्चू कडू देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसोबत गेले. लोकशाहीची तुम्ही थट्टा सुरु केली आहे. ज्यासाठी जनतेने बच्चू कडू यांना निवडून दिले होते त्याप्रमाणे बच्चू कडू वागत नसल्यास देखील या आजोबांनी म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com