दुर्दैवी : थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवली, त्याच शेकोटीत होरपळून महिलेचा मृत्यू

थंडीने संपूर्ण राज्य गारठून गेल्याचं दिसत आहे. यामुळे प्रत्येक जण आपआपल्या परीने थंडीपासून रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. गावाकडे कोणी शेकोटी पेटवतात तर कोणी गाड्यांचे टायर पेटवून त्याला शेकत बसतात.
दुर्दैवी : थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवली, त्याच शेकोटीत होरपळून महिलेचा मृत्यू
दुर्दैवी : थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवली, त्याच शेकोटीत होरपळून महिलेचा मृत्यूSaam TV

नाशिक : थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देशासह महाराष्ट्रातही कडक थंडीची लाट पसरली असून या थंडीने संपूर्ण राज्य गारठून गेल्याचं दिसत आहे. शिवाय या दिवसांमध्ये प्रत्येक जण आपआपल्या परीने थंडीपासून (Cold) रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग गावाकडे कोणी शेकोटी पेटवतात तर कोणी गाड्यांचे टायर पेटवून त्याला शेकत बसतात. मात्र थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

दुर्दैवी : थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवली, त्याच शेकोटीत होरपळून महिलेचा मृत्यू
UP Elections 2022: नवाब मलिक घेणार सपा नेते अखिलेश यादव यांची भेट...

सदरची घटना नाशिकमधील (Nashik) असल्याचं समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोदाकाठाला असणाऱ्या वाघाडी परिसरामध्ये एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. तर या महिलेच्या मृतदेहा शेजारी शेकोटी असल्याने तिचा मृत्यू शेकोटीमुळे होरपळून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे देखील पहा -

मात्र, या बातमीला प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जसंच मृत्यू झालेली महिला कोण आहे. तिचं नाव काय याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र शेकोटीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याच्या चर्चेने मात्र तेथइल नागरिकांमध्ये एकच खळबख उडाली आहे.

Edited

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com