Nana Patole : अखेर नाना पटोलेंनी सांगितलेला 'तो' गावगुंड मोदी माध्यमांसमोर हजर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या कथित मोदीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तो गावगुंड मोदी आज अखेर नागपूरात अवतरला आहे. काँग्रेस समर्थित वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणलं आहे.
Nana Patole : अखेर नाना पटोलेंनी सांगितलेला 'तो' गावगुंड मोदी माध्यमांसमोर हजर
Nana Patole : अखेर नाना पटोलेंनी सांगितलेला 'तो' गावगुंड मोदी माध्यमांसमोर हजरSaam Tv

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ज्या कथित मोदीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तो गावगुंड मोदी आज अखेर नागपूरात अवतरला आहे. काँग्रेस समर्थित वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणलं खरं मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना या मोदीला चांगलाच घाम फुटला होता.

भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्यानं नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा ऍड. सतीश उके यांनी केलाय. मुळात या मोदीचं मुळं नाव उमेश घरडे उर्फ मोदी (Modi) असं आहे. अनेक लोकं त्याच्या मागे लागले त्यामुळं तो घाबरून आपल्याकडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचं उके यांनी सांगितलं.

Nana Patole : अखेर नाना पटोलेंनी सांगितलेला 'तो' गावगुंड मोदी माध्यमांसमोर हजर
"कोरेगाव-भीमा लढाईचे 'ते' पुस्तक माळवदकरांनी नव्हे; RSS शी संबंधित व्यक्तीने लिहलंय'

तथाकथित मोदी याला मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना चांगलाच घाम फुटला. आपण दारू विकत होतो, दारू पितो, पत्नी आपल्याला सोडून गेली, आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असं सांगत 2020 पासून आपल्याला मोदी असं टोपण नाव पडल्याचं सांगितलं. मात्र, मोदी नाव कसं पडलं हे मात्र सांगण्यास नकार दिला. पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तर अर्ध्यावर सोडून या मोदीनं अक्षरशः पळ काढला. त्यामुळं खरंच नानांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हाच होता, की तो हाच आहे असा केविलवाणा प्रयत्न होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.