
Ulhasnagar News: अमेरिका आणि तेथील व्यक्तींसह लाईफस्टाईलचं सर्वांनाच आकर्षण आहे. येथे राहून आलेल्या व्यक्तीकडे भारतात फार कुतूहलाने पाहिलं जातं. प्रत्येक तरुण मुलं आपणही यूएसएला जाऊन शिक्षण घ्यावं अथवा नोकरी करावी असं स्वप्न पाहत असतात. अशात तुम्हाला माहितीये का आपल्या देशात आणि तेही महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये देखील एक युएसए आहे. (Latest Ulhasnagar News)
मुंबईच्या उपनगरांपैकी एक असलेल्या उल्हासनगरला देखील यूएसए असं म्हटलं जातं. या शहरात मोठी बाजारपेठ आहे. कपडे, प्लास्टीक, खाण्यापिण्याच्या अनेक वस्तू अशा बऱ्याच गोष्टी या शहरात तयार होतात. इथे अनेक प्रकारच्या फॅक्ट्री आणि कंपनी आहेत.
उल्हासनगरला यूएसए नाव का पडलं?
देशाची फाळणी झाली तेव्हा एक मोठा सिंधी समाज या शहरात वास्तव्यास आला. सुरुवातीला या ठिकाणी उल्हासनदीने बराच मोठा परिसर व्यापला होता. तसेच आजुबाजूच्या परिसरात संपूर्ण जंगल होते. मात्र सिंधी लोकांनी आपले मसाले आणि अन्य छोट्या मोठ्या वस्तू विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे ही एक मोठी बाजारपेठ बनली.
सिंधी समाजाने या शहरात आपलं वर्चस्व स्थापन केलं. यावेळी त्यांनी उल्हासनगर सिंधी असोसिएशनची स्थापना केली. या मार्फत त्यांनी आपल्या वस्तू संपूर्ण भारतात पोहचवल्या. मुंबईच्या अगदी मोठमोठ्या शहरांना येथूनच माल पुरवला जातो. येथील बाजारपेठेतील माल हा फक्त भारतातच नाही तर परदेशातही विकला जातो.
अशात उल्हासनगर सिंधी असोसिएशनचा शॉर्टफॉर्म यूएसए असा होतो. त्यामुळे येथून जगभरात जाणाऱ्या मालावर यूएसए असं लिहिलेलं असतं. त्यामुळे या शहराचं नाव आता यूएसए असं पडलं आहे. या नावावर अनेक व्यक्तींनी अक्षेप घेतला आहे. परदेशी अनेक व्यक्तींनी यूएसए नाव पाहून प्रोडक्ट खरेदी केल्यावर नंतर त्यांना हे उल्हासगन आहे असं समजलं तेव्हा त्यांनी यावर अक्षेप घेतला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.