
निवृत्ती बाबर
Shambhuraj Desai: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदार आणि खासदारांविषयी मोठं विधान केलं होतं. शिंदे गटातील २२ आमदार आणि ९ खासदार ठाकरे गटात येणार असल्याचा दावा विनायक राऊतांनी केला. यावेळी शिंदे गटाच्या काही प्रमुख नेत्यांची नावे त्यांनी घेतली होती. यामध्ये शंभूराज देसाई यांचे नाव देखील घेण्यात आले होते. (Latets Political News)
विनायक राऊतांच्या खळबळजनक दाव्यानंतर आता शंभूराज देसाई यांनी थेट महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या वक्तव्यानं महाविकास आघाडी खिळखिळीत होणार का? असा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे. महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत लवकरच मोठे स्फोट होतील, असं दावा शंभूराज देसाईंनी केलं आहे.
आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना शंभूराज देसाई यांनी म्हटलं की, " ठाकरे गट दिशाहिन झालेला आहे. स्वतः सरकारमध्ये असताना काहीच कार्यक्रम केलेला नाही. सरकारने आपल्या दारी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. ते हाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत लवकरच मोठे स्फोट होतील, असं खळबळजनक वक्तव्य देसाईंनी केलं.
पत्रकारांशी बोलताना पुढे शंभूराज देसाई यांनी विनायक राऊतांवर टीका करताना डिफरमेशनची नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. " दोन दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) हे बोलले होते की, मी त्यांच्या संपर्कात आहे. उद्धव साहेबांना कॉल केला आहे, असं म्हटले होते. त्याचं हे विधान धादांत खोटं असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.
"मी आज डिफरमेशनची नोटीस त्यांना देणार आहे. आज पाचच्या अगोदर त्यांना मी नोटीस देतोय. ठाकरे गटाची परिस्थिती ही हातबल झाल्यासारखी आहे. त्यांना कितीही आरोप करायचे ते करुद्या. आम्ही काम करत राहू ते आरोप करतील आणि आम्ही ऐकून घेऊ असं नाही. त्यांना आज नोटीस देतो त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं नाही तर आम्ही कायदेशीर बाबी पडताळू पाहू, असा इशारा शंभूराज देसाईंंनी दिला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.