Latur: पोलिसांनी जप्त केल्या 6 चोरीच्या दुचाकी; 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त!

मोटारसायकल चोरीची आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता...
Latur Crime News
Latur Crime Newsदीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातुर: जिल्ह्यातील औसा (Ausa) तालुक्यातील भादा पोलिसांनी 6 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून चोरट्यांने कमी किंमतीत मोटारसायकल विकल्या आहेत या दुचाकी भादा पोलिसांनी जप्त केल्या असून चोरीच्या मोटारसायकल घेतलेल्या नागरिकांनी भादा पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी केले आहे. (Latur Crime News)

Latur Crime News
गरीब मुलाशी लग्न झालेल्या उच्च शिक्षित नववधूने केली आत्महत्या; नवरदेवास केवळ 6 हजार मानधन!

औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त बातमीदाराने भादा पोलिसांना गुप्त माहिती दिली. औसा तालुक्यातील बेलकुंड येथील आरोपी पवनराजे गुलाब चव्हाण याने चोरी करून 3 लाख 60 हजार रुपये किमंतीच्या 6 मोटारसायकलची विक्री केली. तर, मोटरसायकल चोराने मी बेलकुंड येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे नोकरी करत असून, माझ्यावर विश्वास ठेवा मी मोटरसायकलचे कागदपत्र आठ दिवसात तुम्हाला देतो असे सांगून मोटार सायकलीची लोकांना विक्री केल्या आहेत. (Latur News Updates)

हे देखील पहा-

सदर आरोपी कडून मोटारसायकल चोरी करणारी मोठी टोळी निष्पन्न होऊन आणखी बऱ्याच चोरीच्या मोसा मिळण्याची शक्यता आहे. जनतेने कोणी बिना कागदपत्राच्या मोटरसायकल खरेदी केली असल्यास त्या चोरीच्या असण्याची शक्यता असल्याने तात्काळ पोलीस स्टेशन भादा येथे संपर्क करून जमा कराव्यात असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार यांचे मार्गदर्शनाखाली , API विलास नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश सारोळे, चंद्रकांत सूर्यवंशी, शिवरुद्रा वाडकर, चंद्रकांत कलमे, महादेव चव्हाण यांनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com