
संदीप भोसले, साम टीव्ही
Latur Mother Son Accident News: लातूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर निघालेल्या आई आणि मुलाला भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (१६ मे) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. (Breaking Marathi News)
अविनाश रमेश राऊत (वय २४ वर्ष) आणि शांताबाई रमेश राऊत (वय ५२ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकांची नावे आहेत. दोघेही सारोळा (Latur News) येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश राऊत हा काही कामानिमित्त आपल्या आईला सोबत घेऊन दुचाकीवरून बाभळगाव जाण्यासाठी निघाला होता.
दरम्यान, दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी (Accident) भीषण होती, की यामध्ये शांताबाई राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेश गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन केला.
मात्र, रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने अतिरक्तस्राव होऊन रमेश याचाही मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रमेश आणि त्याच्या आईचा अपघात झाला. त्याठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर बाभळगाव रुग्णालय होते. (Latest Marathi News)
मात्र, रुग्णालयात एकही कर्मचारी हजर नसल्याने आणि रुग्णावाहिका तब्बल १ तास उशीरा आल्याने रमेश याचा जीव गेल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.