नांदेड बिदर राज्य महामार्गावर भीषण अपघात; 15 प्रवासी जखमी
Latur AccidentSaam TV

नांदेड बिदर राज्य महामार्गावर भीषण अपघात; 15 प्रवासी जखमी

Latur Accident : धडक इतकी भीषण होती की, यामध्ये ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली

लातूर : खडी (ता. पालम) येथून उदगीरकडे येत असलेली ट्रॅव्हल्स आणि उदगीरकडून लालीकडे (ता. जळकोट) जाणारी कार या दोन गाड्यांची नांदेड बिदर राज्य महामार्गावरील लोणी मोड येथे समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latur Car Travels Accident)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खडी (ता. पालम) येथून लग्नसमारंभासाठी 15 जणांना घेऊन ट्रॅव्हल्स उदगीरच्या दिशेने येत होती. त्याचवेळी उदगीरकडून लालीकडे (ता. जळकोट) जाण्यासाठी दोघे पती-पत्नी कारने प्रवास करत होते. दरम्यान, दोनही वाहनांमध्ये नांदेड बिदर राज्य महामार्गावरील लोणी मोड येथे समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधील 15 तर कारमधील पती-पत्नी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपकुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक चेरले, उपनिरीक्षक बनसोडे, बीट अंमलदार संतोष शिंदे, सचिन नारागुढे, तुळशीराम बरूरे, राहुल गायकवाड, राम बनसोडे यांच्यासह मंगेश खंदाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या लोकांना पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.