गढूळ पाण्याविरोधात भाजपचे रंगबिरंगी आंदोलन

गढूळ पाण्याविरोधात भाजपचे रंगबिरंगी आंदोलन
Latur News
Latur NewsSaam tv

लातूर : शहरात महापालिकेकडून होत असलेला पाणी पुरवठा गढूळ स्‍वरूपाचा होत आहे. या विरोधात भाजपने (BJP) आज आंदोलन करत रंग मिश्रीम पाणी आणत महापालिकेच्‍या प्रवेशद्वाराजवळ ओतले. (latur corporation news BJP's colorful agitation against muddy water)

Latur News
विवाह होवून काही दिवसातच नववधूचा मृत्‍यू; तीन आठवड्यांचाच झाला संसार

महापालिकेच्यावतीने गेल्या दोन (Latur News) आठवड्यांपासून नळाद्वारे पुरवठा करण्यात आलेल्या पाण्याचा रंग काहीसा पिवळसर आला होता. त्यानुसार नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून मनपाने पाण्याची तपासणी करून पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करत भाजपच्यावतीने दोन दिवसांपासून शहरात बॅनरबाजी करत आज आंदोलनाचा इशारा दिला होता.

पाण्यात मिसळला रंग

प्रत्यक्षात पाण्याचा रंग जास्त गढूळ दिसावा यासाठी पाण्यात पिवळा आणि लालगुलाबी रंग मिसळून ते पाणी रिकाम्या बाटल्यात भरण्यात आले. दोन टेम्पो भरून रंग मिश्रित पाण्याच्या बाटल्या भरून आणून पालिकेच्या दारात ओतण्यात आल्या. हे आंदोलन पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. लोकांच्या देखील लक्षात आले, कि हे पाणी गढूळ नसून रंग मिश्रित आहे. आता भाजपचे आजचे आंदोलन हे जनतेसाठी होते कि स्टंटबाजी? हा सवाल मात्र लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com