बिल देण्यासाठी QR कोड मागवला अन् दुकानदाराची केली ४७४७२ रुपयांची फसवणूक

आजकाल कोणतीही गोष्ट खरेदी करायला गेल्यावर आपण क्यूआर स्कॅन (QR Scan) करुन ऑनलाईन बिल भरतो.
QR code Payment
QR code PaymentSaam TV

लातूर: सध्याच्या डिजिटल युगात आपण प्रत्येक काम करताना ऑनलाईन (Online) पद्धतीचा वापर करतो. शिवाय आजकाल कोणतीही गोष्ट खरेदी करायला गेल्यावर क्यूआर स्कॅन (QR Scan) करुन ऑनलाईन बिल भरणं हे तर आपल्या जीवनामधील अविभाज्य भाग बनला आहे.

मात्र, क्युआर कोड वापरणं जसं सोप्प आणि सोयीस्कर आहे तसंच ते काळजी न घेता वापरल्यास किती धोकादायक आहे याचा प्रत्येय लातुरमधील (Latur) चाकूर येथे आला आहे. गार्डन पाईप विकत घेत त्याचं बिल पाठविण्यासाठी ढनलाई एक रुपया पाठवण्यास सांगीतलं आणि क्युआर कोडच्या माध्यमातून दुकानदाराची तब्बल ४७४७२ फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पाहा व्हिडीओ -

गार्डन पाईप पाहिजे असे सांगून माल खरेदी केला, पाईपची रक्कम क्युआर कोडच्या माध्यमातून पाठवण्याच्या बहान्याने तब्बल ४७४७२ रुपयांना दोघांना फसवण्यात आल्याची घटना घडली. चाकूर पोलीस ठाण्यात (Chakur Police Station) या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गोपाळ ज्ञानोबा जक्कलवाड यांनी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मसिंग नावाने एका व्यक्तीने मोबाईलवरून फोन करून गाईन पाईप मिळतात का अशी विचारणा केली. १८२५० रुपयांचे बील मोबाईलवर पाठवण्यास सांगीतले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मोबाईलवरून फोन आला आणि रक्कम तुम्हाला पाठवण्यासाठी क्युआर कोड पाठवण्यास सांगीतले. शिवाय दुकांदाराला त्यांचेच खाते आहे याची खातरजमा करण्यासाठी एक रुपया पाठवण्यासही सांगीतला.

QR code Payment
अफजल खान वध देखाव्याच्या परवानगीवर ठाकरे गटातील नेते म्हणाले, पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात...

त्यानुसार आरोपीला १ रुपया पाठविला असता क्युआर कोडच्या माध्यमातून ३६५०० फिर्यादीच्या खात्यातून रक्कम ट्रान्सफर करून घेतली. त्यानंतर पुन्हा २२२२२ रुपये काढून घेण्यात आले अशी एकूण ४७४७२ रुपयांची फसवणूक करण्यात आली.

त्याचप्रमाणे फिर्यादीचा मित्र शेख वाजीद अजमसाब याच्या खात्यामधूनही क्युआर कोडच्या माध्यमातूनच ५००० आणि २००० असे एकूण ७ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक करण्यात आली. दोघांचीही फसवणूक करणारा व्यक्ती एकच होता. चाकूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाय कसल्याही प्रकारचे ऑनलाईन बिल देताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com