Latur News: उदगीर तालुक्यात दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल

प्रशासनाची कारवाई ४ गावांतील बोगस डॉक्टरांची झाडाझडती
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - जिल्ह्यातील उदगीर (Udgir) तालुक्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील बोगस डॉक्टर (Doctor) कारवाई कृती समिती तर्फे बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुडसुर व शिरोळ येथे विनापरवाना बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. सुपाल चंद्रमोहन दास आणि स्वप्नकुमार बिस्वास अशी बोगस डॉक्टरांची नावे आहेत.

हे देखील पाहा -

उदगीर तालुक्यात प्रशासनाच्या वतीने बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर कारवाई कृती समिती पथकाद्वारे तालुक्यातील विविध गावात जाऊन बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यात येत आहे.

Latur News
लातुरात आधी अतिवृष्टी, गोगलगाय अन् आता पिवळी पाने पडणाऱ्या रोगाचा धोका

बोगस डॉक्टर शोधमोहीम पथकाने तालुक्यातील गुडसूर, शिरोळ (जा.), हंडरगुळी, दावणगाव या ठिकाणी धाडी मारल्या. गुडसूर येथे बोगस डॉक्टर सुपाल चंद्रमोहन दास आणि शिरोळ येथे बोगस डॉक्टर स्वप्नकुमार बिस्वास हा इंडियन मेडिकल कौन्सिलचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नसताना अनाधिकृतरित्या दवाखाना चालवत असल्याचे निदर्शनास आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com