Latur: बॅरेजवरील लोखंडी प्लेट्स चोरणाऱ्या टोळीला अटक

औराद शहाजानी पोलिसांची कारवाई, नाकाबंदी केल्यानंतर हाती लागले आरोपी
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - दोन दिवसांपूर्वी वांजरखेडा बॅरेजवरील लोखंडी प्लेट्स चोरिला गेल्याची घटना घडल्यानंतर औराद शहाजानी पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर तातडीने नाकाबंदी केल्यानंतर २४ तासांच्या आत तीन आरोपींना अटक (Arrest) करण्यात यश आले आहे. औराद शहाजानी पोलिसांच्या हद्दीतील वांजरखेडा बॅरेजवरील १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे ५६ लोखंडी दरवाजे चोरीला गेल्याची घटना घडली होती.

हे देखील पाहा -

या संदर्भात निलंगा पाटबंधारे विभागाचे बिट प्रमुख सय्यद रहिमोद्दीन यरोळे यांच्या तक्रारीवरून औराद शहजानी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वतीने परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती.दरम्यान एक संशयास्पद टेम्पो थांबविण्यात आला. त्याची झडती घेतली असता प्रत्यक्षात आत मध्ये बॅरेजवरुन चोरीला गेलेले लोखंडी प्लेट असल्याच्या आढळून आल्या. गाडीतील तीन तरुण पळून गेले.

Latur News
उधारीच बिल मागितल म्हणून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण; हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पळून गेलेल्या अरोपींचा पाठलाग करुन पकडण्यात आले असता त्यांची नावे, हनुमंत पांडुरंग मोरखंडे, विशाल संभाजी पाटील, विकास करण बिराजदार आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे आढळून आले. या सर्वांना अटक करण्यात आल असून पुढिल तपास औराद शहाजानी पोलीस करित आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com