Crime News: लातुरात खळबळ..शेतात सापडले मानवी शरीराचे तुकडे; खून की हिंस्र प्राण्याचा हल्ला?

लातुरात खळबळ..शेतात सापडले मानवी शरीराचे तुकडे; खून की हिंस्र प्राण्याचा हल्ला?
Latur Crime News
Latur Crime NewsSaam tv

लातूर : लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील शिवारात साठ वर्षे वय असलेल्या शेतकऱ्याचे त्यांच्याच शेतात प्रेताचे तुकडे आढळून आले. यामुळे या शेतकऱ्याचा (Farmer) खून झाला आहे की हिंस्र प्राण्याने हल्ला केला; हे अद्याप लक्षात येत नसून घटनास्थळी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) दाखल झाले आहेत. (Maharashtra News)

Latur Crime News
Akola News: नववर्षापासून आरटीओचा नवा नियम; अकोलेकरांना करावे लागेल पालन

लातूरपासून (Latur) जवळच असलेल्या बाभळगाव येथील सेलु रस्त्यावर ६० वर्षीय बशीर मतदार शेख यांची जमीन आहे. ते शेतात पिकाला पाणी देण्यासाठी म्हणून सोमवारी रात्री बॅटरी घेऊन गेले होते. दरम्यान रात्री आठ वाजेपर्यंत ते पिकाला पाणी देत असल्याचे शेतात बॅटरी चमकत असल्याचे आसपासच्या शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी बशीर शेख हे घरी आलेच नाही. नातेवाईकांनी शोध घेतला, परंतु ते सापडले नाही. दरम्यान त्यांची लुना दुचाकी आणि बूट दिसून आल्याने घरच्या नातेवाईकांना (Crime News) शंका आली.

शेतात सापडले तुटलेले हात व पाय

आज सकाळी शेतात दोन पाय, एक हात शरीरा वेगळे अस्‍तावेस्त पडल्याचे दिसून आले. नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांची संपर्क साधला. तेव्हा लातूर ग्रामीण ठाण्याचे पोलीस व कर्मचारी अधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांना त्या शेतकऱ्याच्या स्वतःच्या शेतात शरीरापासून वेगळे झालेले दोन पाय काही अंतरावर ज्वारीच्या पिकात एक हात आढळून आले. त्यामुळे नातेवाईकांची शंका वाढली असून शेतातील हे प्रेत बशीर शेख यांचे असावे; अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस अधिक तपास करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com