Latur Crime : अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला; मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर बलात्कार

गावातील सप्ताहाच्या कार्यकमाला घरी आलेल्या मित्राने, मित्राच्याच बायकोचा बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला.
Latur Crime News
Latur Crime NewsSaam Tv

Latur Crime News : गावातील सप्ताहाच्या कार्यकमाला घरी आलेल्या मित्राने, मित्राच्याच बायकोचा बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर हा व्हिडीओ तुझ्या नवऱ्याला दाखवितो, असे दोन म्हणत त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. सदर घटनेची माहिती पीडित विवाहितेने पतीला दिल्यानंतर या तरुणाविरुद्ध अहमदपूर पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latur News Today)

Latur Crime News
Pratapgad : प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठी कारवाई; अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण पाडलं

प्राप्त माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील गंगाहिप्परगा येथील रहिवासी असलेला स्वप्नील राजेंद्र टाकळे याचा मित्र अहमदपूर तालुक्यातीलच एका गावात वास्तव्यास आहे. मित्राच्या गावात सप्ताहाचा कार्यक्रम असल्यामुळे दोन वर्षांपूर्वी स्वप्निल मित्राच्या गावात गेला होता.

यावेळी मित्राच्या घरात गेल्यानंतर त्याची बायको बाथरुममध्ये अंघोळ करीत असताना त्याच्या नजरेस पडली. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने महिलेचा (Crime) व्हिडीओ बनवला. काही दिवसानंतर हा व्हिडीओ विवाहितेला दाखवून त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. हा व्हिडीओ तुझ्या नवऱ्याला दाखवतो असे म्हणत त्याने दमदाटी करु लागला.

Latur Crime News
Kolhapur Crime News : काेल्हापूरात खळबळ; मित्राचा खून करुन युवक पाेलिसांना शरण

याच व्हिडीओचा फायदा घेऊन आरोपी स्वप्निल याने आपल्याच मित्राच्या बायकोवर वारंवार बलात्कार केला. दिवसेंदिवस आरोपीचं स्वप्नीलचे कृत्य वाढतच गेल्याने पीडितेने अखेर घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला.

पत्नीवर आपल्याच मित्राने बलात्कार केल्याचं कळताच, पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने पत्नीला सोबत घेत थेट अहमदपूर पोलीस स्टेशन गाठलं. याप्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com