Latur Crime News:लातूरमध्ये चोरांचा सुळसुळाट; घरफोडीमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आपल्याघरी चोरी झाल्याचे समजताच त्यांनी उदगीर शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
Latur Crime News
Latur Crime NewsSaam TV

Latur Crime News: लातूर जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. या आठवड्यात दोन ठिकाणी घरफोडी करत लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. घरफोडीच्या घटनांचे वाढते प्रमाण पाहता नागरिकाच्या चिंतेत वाढ झाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

पहिली घटना संमिश्र कॉलनी, नई आबादी भागात घडली आहे. येथील गुरुनाथ कार्तिक स्वामी मठपती यांच्या घरातून ५ लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. कार्तिक यांनी कपाटातील लॉकरमध्ये २१ तोळे सोन (Gold) ठेवलं होतं. सकाळी त्यांनी कपाटाचे दार उघडले तेव्हा कपाटाचे लॉक तुटले होते आणि त्यातील २१ तोळे सोन देखील गायब होतं.

आपल्याघरी चोरी झाल्याचे समजताच त्यांनी उदगीर शहर पोलिस (Police) ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास सुरु केला आहे. या प्रकरणी गुरुनाथ कार्तिक स्वामी यांच्या जबाबावरून बुधवारी पहाटे चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दागिन्यांची किंमत ५ लाख ९९ हजार २०० रुपये इतकी आहे.

Latur Crime News
Electricity Theft : वीजचोरीची रक्कम ऐकाल तर थक्क व्हाल, एकट्या औरंगाबाद विभागात 4,123 ठिकाणी वीजचोरी

दुसरी घटना लातूरातील सुभाषनगर येथील पार्थ अपार्टमेंटमध्ये घडली आहे. बबन सदाशिव चव्हाण यांच्या फ्लॅटचे टाळे तोडून चोरटे घरात शिरले. बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचे दार तोडून तब्बस ७१ हजार ४०० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. यात झुमके, गळ्यातील कंठी, अंगठी, कानातील रिंग, रोख रक्कम असा एकूण ७१ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

Latur Crime News
Theft: जेलमधून सुटताच बंद घरामध्ये केली चोरी

सदर घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरात बंद घरे, अपार्टमेंटमध्ये असलेले बंद फ्लॅट यांवर चोरटे लक्ष ठेवून आहेत. रात्रीच्या शांततेचा फायदा घेत चोरटे घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत आहेत. तसेच शहरात दुचाकी चोरट्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यामुळे लातूर पोलिसांचे एक पथक सध्या चोरी करणाऱ्या टोळक्यांच्या शोधात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com