Crime News: महिला आंघोळ करत असताना छेड काढली, शिवीगाळ करून दिली जीवे मारण्याची धमकी

Latur Crime: महिला आंघोळ करत असताना तिची छेड काढत विनयभंग केला आणि नंतर शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उदगीरमध्ये घडली आहे.
Latur Crime
Latur Crimesaam tv

Latur News: महिला आंघोळ करत असताना तिची छेड काढत विनयभंग केला आणि नंतर शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उदगीरमध्ये घडली आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur Crime
Govt Employee Strike: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही सरकारी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम, उद्यापासून 19 लाख कर्मचारी संपावर

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर शहरातील एका भागात ३८ वर्षीय महिला आंघोळ करत असताना आरोपीने तिच्या घरावर जाऊन तिची छेड काढली. या संतप्त प्रकारावर महिला आणि तिचा मुलगा जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा त्यांना आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. (Latest Marathi News)

Latur Crime
Farmers protest: शेतकऱ्याच्या प्रश्नावर तोडगा निघणार? मुख्यमंत्र्यांची उद्या शिष्टमंडळासोबत बैठक

तसेच आरोपी नुरुल हक्क खुदुस पटेल आणि सय्यदुल हक्क खुदुस पटेल यांनी महिलेसह तिच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलिसांत विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latur Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com