जिल्‍हा बँक निवडणुक : भाजपाला दिवाळी गोड; विराेधकांना चपराक

BJP
BJP

लातूर : येथील जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी छाननीत अवैध ठरविलेल्‍या उमेदवारांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था लातूर यांच्‍याकडे दाखल केलेल्‍या अपिलाचा निर्णय होवून विरोधी नऊ जणांचे दहा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्‍यात आले. या निकालामुळे सत्‍ताधाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार रमेशअप्‍पा कराड यांनी दिली. Latur Dcc Bank Election BJP

लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक मंडळ निवडीसाठी २१ नोव्‍हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सत्‍ताधाऱ्यांच्‍या विरोधात भाजपाने सर्व जागांवर ३५ उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. प्रत्‍येक मतदारसंघात तोडीस तोड उमेदवार देण्‍याचा प्रयत्‍न भाजपाने केला आहे.

BJP
BSNL फुलझडी, बुलेट बाॅम्ब फेस्टिव्ह Offer या तारखेपर्यंत वैध

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीसाठी दाखल झालेल्‍या अर्जाची गेल्‍या २० ऑक्‍टोबरला छाननी झाली. या छाननीत सत्‍ताधाऱ्यांकडून विरोधकांच्‍या सर्व उमेदवारांवर आक्षेप नोंदवण्‍यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे यांनी या आक्षेपाच्‍या सुनावणी अंती विरोधकांचे सर्व अर्ज अवैध ठरविले. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्‍या या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था लातूर यांच्‍याकडे भाजपने अपिल केले. दोन्‍ही बाजूचे म्‍हणणे ऐकुन विभागीय सहनिबंधक रावळ यांनी अवैध ठरविलेल्‍या विरोधी ९ जणांचे १० उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत.

उमेदवारी अर्ज मंजूर केलेल्‍यांमध्‍ये भगवान रामचंद्र पाटील तळेगावकर (सोसायटी मतदारसंघ देवणी), संतोष नागोराव सारंगे (सोसायटी मतदारसंघ शिरूर), अनंतपाळ, बाबु हणमंतराव खंदाडे (इतर मागासवर्ग मतदारसंघ), ओमप्रकाश गिरीधर नंदगावे (भटक्‍या विमुक्‍त जाती मतदारसंघ), सतीश रावसाहेब आंबेकर (मजूर फेडरेशन मतदारसंघ), नवनाथ शिवराज डोंगरे नागरी बँका मतदारसंघ), सुरेखा रमाकांत मुरूडकर, अजंजी सुनिल कावळे, सय्यद इकबालबेगम ईस्‍माइल (महिला प्रतिनिधी मतदारसंघ) आणि अंजली सुनिल कावळे (अनुसूचित जाती मतदारसंघ) या ९ जणांचे १० उमेदवारी अर्ज विभागीय सहनिबंधक रावळ यांनी वैध ठरविले आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com