बाबा म्‍हणून ओरडली अन्‌ क्षणात आवाज बंद; वाहनाच्‍या धडकेत चिमुकली ठार, आजोबा गंभीर

बाबा म्‍हणून ओरडली अन्‌ क्षणात आवाज बंद; वाहनाच्‍या धडकेत चिमुकली ठार, आजोबा गंभीर
बाबा म्‍हणून ओरडली अन्‌ क्षणात आवाज बंद; वाहनाच्‍या धडकेत चिमुकली ठार, आजोबा गंभीर
Accident

लातूर : लातूर– तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू टिप्परने भरघाव वेगाने जोरदार धडक दिली. यात ५ वर्षीय मुलगी जागीच ठार झाली; तर आजोबा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. (latur-news-accident-news-latur-usmanabad-highway-accident-girl-death)

उस्मानाबाद येथुन आजोबा कुंडलिक पालमपल्ले हे गंगाश्री व राजश्री या दोन नातवंडासह निलंगा या गावी जाण्यासाठी औसा येथील तुळजापूर टी पॉईंट इथे उतरले. रस्ता ओलांडत असताना लातूरहून एक मालवाहतूक करणारा टिप्पर (क्र. एमएच २४, एफ ९८२६) हा भरघाव वेगाने आला. यात वाहनवरील नियंत्रण ठेवणे कठीण झाल्यामुळे आजोबा व त्याच्या दोन नातवंडांना धडक बसली.

Accident
तुरटीच्या गणेश मूर्तीबाबत आहे संशोधन; विसर्जनानंतर काय आहेत धोके

चिमुकलीचा अंत

वाहनाच्‍या धडकेत राजश्री सुभाष पालमपल्ले (वय ५) हीचा जागीच मृत्‍यू झाला. तर आजोबा कुंडलिक पालमपल्ले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत असलेली दुसरी एक नात गंगाश्री बाळंबाल सुदैवाने वाचली आहे. आजोबा कुंडलिक पालमपल्ले यांना पुढील उपचारासाठी औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी औसा पोलिसांनी तातडीने धाव घेत वैद्यकीय मदत पुरावण्यास मदत केली. या टी पॉईंट इथे वाहतूक काही काळ खोळंबली होती.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com