Latur News: घोड्यावरून वरात पोहचली महावितरणच्या दारात; डिमांडनोट भरूनही विज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा

घोड्यावरून वरात पोहचली महावितरणच्या दारात; डिमांडनोट भरूनही विज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा
Latur News
Latur NewsSaam tv

लातूर : डिमांड नोट भरून देखील कृषीपंपाला कनेक्शन मिळत नाही. यामुळे संतापलेल्या निलंगा, औसा आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. (Breaking Marathi News)

Latur News
Nashik News: एटीएम सेंटरमध्ये युवतीला गंडा; पैसे काढून देण्याच्‍या बहाण्याने बदलविले कार्ड

कृषीपंपासाठी वीज हवी असल्‍याने शेतकऱ्यांनी डिमांडनोट भरून दिली. परंतु, डिमांडनोट भरले म्हणजे केवळ साखरपुडा झाला आहे. ज्यावेळी वीज कनेक्शन मिळेल; तेव्हा तुमचे लग्न होईल असे वक्तव्य निलंगाचे उपअभियंता शैलेश पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर (Farmer) केले होते.

उपअभियंत्‍याच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध

उपअभियंत्‍याने केलेल्‍या वक्तव्याचा निषेध करीत शेतकरी मोठ्या संख्येने घोड्यावर नवरदेवासारखे सजून वाजत गाजत महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा घेवून आले. निलंगा तालुक्यातील जाऊ येथील शेतकरी संतोष हिरास हे घोड्यावर बसून नवरदेवासारखे हे बँडबाजा घेऊन महावितरण (Mahavitaran) कार्यलयात पोहचले. तातडीने कृषी पंपाला कनेक्शन द्या अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com