औसा तालुक्यात जोरदार पाऊस; आपचुंदा इथ दोघे गेले वाहुन

उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - आज संध्याकाळी लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आपाचुंदा गावाशेजारील ओढ्यात सात वाजण्याच्या सुमारास दोघेजण मोटरसायलवरून जात असताना वाहून गेले आहेत. तर त्यातील एकजण थोडक्यात बचावला आहे दुसरा व्यक्ती वाहून गेला आहे. घटनास्थळी औसा येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे देखील पाहा -

बाभळगाव येथील रहिवासी असलेले आशिष येनकर आणि संतोष बिडे हे मेडिकल रीप्रझेंटिटीव्ह उमरगा येथून बाभळगाव इथ जात होते. दरम्यान आपचूंदा गावा शेजारील ओढ्याला पाणी वाहत आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते दुचाकी वरून निघाले पण त्यात वाहून गेले. यापैकी संतोष बिडे हा थोडक्यात वाचवू शकला तर आशिष येनकर हा वाहून गेला. सदरील घटना आपचूंदा गावात कळताच अनेक गावकरी आणि तरुण ओढ्याकडे धावले.

Latur News
दारुच्या नशेत कार चालकाची २ दुचाकीस्वारांना धडक, सिंहगड रस्त्यावरील घटना

या आशिष यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण ते अद्यापही सापडले नाहीत. या बाबतची माहिती कळताच औसान येथील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तहसीलदार भारत सूर्यवंशी यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. आता आशिष यांचा शोध महसूल, पोलीस अधिकारी आणि अनेक गावकरी शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com