Latur News: २३ कोटी रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार; लातूरात ४ जणांविरुध्द गुन्हा दाखल

२३ कोटी रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार; लातूरात ४ जणांविरुध्द गुन्हा दाखल
Latur News
Latur NewsSaam tv

लातूर : शासकीय रकमेचा एक रुपयांचाही अपहार करता येत नाही, असे सांगितले जाते. मात्र, गेल्या ६ वर्षांमध्ये तब्बल २२ कोटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांचा अपहार करुन लिपीकाने नवीन लातूर (Latur) पॅटर्न घडवला आहे. या अपहार प्रकरणी चार जणांविरुध्द अखेर एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

Latur News
Parbhani News: सालगडी असलेल्‍या तरुणाने संपविले जीवन; आईचा मन हेलावणारा आक्रोश

लातूरमधील शासकीय अपहारप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार सर्वसाधारण पदावर काम करणारे महेश मुकुंद परंडेकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महसूल शाखेतील तत्कालीन लिपीक मनोज नागनाथ फुलबोयणे यांच्याकडे तहसीलदार सर्वसाधारण जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्याचा कारभार होता. २६ मे २०१५ ते १७ मार्च २०२१ पर्यंत त्यांनी या खात्याचे कामकाज पाहिले. या बँक खात्याला मनोज फुलबोयणे यांचा मोबाईल नंबर संलग्न करण्यात आलेला होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधी खात्याचे कामकाज ही तेच हाताळत होते.

दोन धनादेशाची रक्‍कमच जमा नाही

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला खोलीकरण व रूंदीकरण याबाबीसाठी निधी वितरण करण्याचा आदेश होता. जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना दोन धनादेश देण्यात आले होते. १२ लाख २७ हजार २९७ आणि ४१ लाख ६ हजार ६१० रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे निधी वितरण करण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया जुने जिल्हाधिकारी कार्यालया परिसर शाखा येथे धनादेश, आरटीजीएस फॉर्म जमा करण्यात आलेले होते. परंतू ही रक्कमच जमा झालेली नव्हती.

याबाबत जलसंपदा विभागातून त्याचा पाठपुरावा करण्यात आला. बँकेच्या सदरील खात्यामध्ये केवळ ९६ हजार ५५९ रुपये शिल्लक असल्याचे दिसून येत होते. या खात्याचे कामकाज मनोज नागनाथ फुलेबोयणे हे सांभाळत होते. यामधूनच त्याने केलेल्या अपहाराचे धागेदारे प्रशासनाच्या हाती लागले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com