Latur: संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
Latur Shiv Sena
Latur Shiv SenaSaam tv

लातूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. याच्‍या निषेधार्थ लातूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने (Shiv Sena) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. (Latur News Shiv Sena)

शिवसेनेच्‍या आंदोलकांनी केंद्र सरकार, भाजप (BJP) आणि ईडीच्या विरोधात घोषणा देत भाजपच्या बॅनरला जोडे मारून निषेध व्यक्त करत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. केंद्र सरकारने (ED) ईडी, सीबीआयचे शस्त्र वापरून शिवसेना संपवण्याचे काम सुरू केले आहे. अनेक लोकप्रतिनिधी भाजपमध्‍ये प्रवेश केला ते सर्व स्वच्छ झाले का? असा सवाल उपस्थित करत गद्दाराना हाताशी धरून शिवसेना संपवण्याची काम केले जात आहे. लातूरचे शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून शिवसेना अभेद्य राहणार असल्याचे लातूर जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com