Latur News : गुंगीच्या गोळ्या घेण्यात गुंतलीय लातूरची तरुणाई; नेमकं काय आहे प्रकरण?

पोलीसांनी धाड टाकून एका युवकास ताब्यात घेतले आहे.
Latur News
Latur NewsNews Update

लातूर - शिक्षणासाठी लातूरमध्ये (Latur) येणाऱ्या शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. अनेक विद्यार्थी गुंगीच्या गोळया घेण्याच्या आहारी गेले असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी पोलीसांनी धाड टाकून एका युवकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळ तब्बल 350 गोळया सापडल्या आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात संबंधित युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

लातूर शहरात सध्या गुंगीच्या गोळयांची विक्री खुले आम होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण मोहनराव राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार एस. एस. सी बोर्डाकडे जाणऱ्या रस्त्यावर एक युवक गुंगीच्या गोळयांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी अन्न औषध प्रशासन कार्यालयातील अधिकारी आणि पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाड टाकली.

Latur News
महात्मा गांधीजींनंतर नरेंद्र मोदीच भारतीयांना समजून घेतात: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

सुमित कासले वय 22 रा. दापक्यात ता.चाकूर सध्या राहणार विवेकानंद चौक लातूर हा गुंगीच्या गोळया विक्री करण्यासाठी बसलेला होता. त्याच्या ताब्यातून 10 एमजी च्या तब्बल 350 गोळया दोन बॉक्समध्ये आढळून आल्या. सदरील गोळया जप्त करण्यात आल्या असून त्याच्याविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com