थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे यांचा पठाणकोटमध्ये मृत्यू

दोन जवानांमध्ये आपापसात फायरिंग झाले होते यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजच आहे.
Suryakant Telangana
Suryakant TelanganaSaam Tv

लातूर: लातूर (Latur) जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथील जवान सूर्यकांत शेषराव तेलंगे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना दोन जवानांमध्ये आपापसात फायरिंग झाले होते, यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावांसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Suryakant Telangana
कुर्ल्यात ४ मजली इमारत कोसळली; अनेकजण दबल्याची भीती

अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असलेल्या शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, तर माध्यमिक शिक्षण रापका येथे झाले. घरची परिस्थीती बेताची असल्याने त्यांनी पुढील शिक्षण घेणे टाळले व दशसेवा करण्यासाठी सैन्य भरतीत जाण्याची तयारी सुरू केली.

Suryakant Telangana
धक्कादायक! अमेरिकेतील टेक्सासमध्ये सापडले ४० मृतदेह

सैन्य भरतीसाठी (Army ) महाड येथील कै. रवींद्र करिअर अकॅडमी पोलादपूर महाड येथे भरती पूर्व प्रशिक्षण घेऊन रायगड येथे २००७ मध्ये सैन्य दलात भरती झाले. आजपर्यंत १५ वर्षे देशसेवा केली. अवघ्या ३५ व्या वर्षी पठाणकोट सीमेवर आतंकवादी हल्यात ते शहीद झाले.

त्यांच्या पश्चात पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार असून, आज दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव थेरगाव या त्यांच्या मुळ गावी येईल असे ग्रामस्थांतून सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com