युवकांनी चाेरल्या 19 दुचाकी; दाेघे अटकेत, दाेघे फरार

युवकांनी चाेरल्या 19 दुचाकी; दाेघे अटकेत, दाेघे फरार
arrest

लातूर : लातूर जिल्ह्यातील अनेक भागात दुचाकी वाहन चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. पाेलिस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे गतीमान करीत दाेघांना रंगेहाथ पकडले arrest आहे. त्यांच्याकडून तब्बल 19 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. (latur-police-arrested-two-19-two-wheeler-theft-sml80)

पाेलिसांनी लातूर शहरातील वसवाडी येथे सापळा लावून अविनाश उर्फ बापू तानाजी येमगर (वय 27) आणि औसा तालुक्यातील किल्लारी येथील मच्छिंद्र दत्तात्रय क्षीरसागर (वय25) या दाेन संशियतांना चाेरीच्या मोटरसायकलसह रंगेहाथ पकडले.

या दाेन संशयितांकडे चाैकशी केली असता त्यांनी लातूर शहर, मुरुड, औसा येथून मोटरसायकल चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून तब्बल 19 दुचाकी 11 लाख पंधरा हजार रूपयांचा मुद्देमालसह हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे इतर दोन साथीदार तुकाराम मनोहर कुंभार आणि सुनील उर्फ बाळा वसंत कोळपे हे दोघे जण असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

arrest
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक अमूल्य ठेवा

नागरिकांनी आपल्या दुचाकी सुरक्षित ठिकाणी लावाव्यात. तसेच हॅन्डल लाॅक करून लावाव्यात. जुने वाहन खरेदी करताना कागदपत्र पाहणी करून घ्यावेत. यात काही संशयास्पद वाटल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क करावे असे आवाहन पोलिस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com