Latur : थांबा, सीट बेल्ट वापरा ! लातूरात ३०८ चालकांवर खटले दाखल, ६२ हजारांचा दंड वसूल

आता अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी सीटबेल्ट प्रबोधन मोहीम हाती घेतली आहे.
latur, seat belt awareness program, latur traffic police
latur, seat belt awareness program, latur traffic policesaam tv

Latur News : सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने सोमवारपासून विशेष मोहीम राबविली जात आहे. सध्या सुरु असलेल्या तपासणीत आत्तापर्यंत ३०८ वाहनधारक दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर खटला दाखल करून ६१ हजार ८०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिस दलातून देण्यात आली.

लातुर शहरात सीट बेल्ट न वापरणाऱ्या वाहनधारकांचे प्रबाेधन करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. प्रबाेधनात्मक उपक्रम आणि कारवाईचा बडगा अशी माेहिम लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सुरु केली आहे. त्यामुळे वाहनधारकांत जागृती हाेऊन अपघात टळेल असा दावा केला जात आहे.

या माेहिमेअंतर्गत नांदेड रोड, रिंगरोड परिसरात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अलीकडे रस्ते अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. परिणामी यातील मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. रस्त्यावरील अपघातात (accident) सर्वाधिक जीवितहानी ही केवळ सीटबेल्ट न वापरल्याने झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता हे अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी लातूर पोलीस (police) दलाने विशेष पुढाकार घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

latur, seat belt awareness program, latur traffic police
VITTHAL RUKMINI MANDIR : पस्तीस वर्ष वारक-यांचा भार झेलणारा सात मजली दर्शन मंडप हाेणार जमीनदाेस्त (पाहा व्हिडिओ)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com