गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतानाही भरवली शाळा

आज हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळी 10 ते 1 वाजण्याच्या दरम्यान 8 ते 12 वी शाळा भरवण्यात आली.
गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतानाही भरवली शाळा
गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतानाही भरवली शाळा दिपक क्षीरसागर

लातूर: राज्य शासनाच्या (State Government) आदेशाने ज्या गावात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण नाही अश्या गावात ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक पालक यांनी निर्णय घेऊन शाळा सुरू कराव्यात अश्या सूचना असताना लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ येथे दोन रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह निघाले असताना आज शाळा भरवण्यात आली होती.

लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ या गावात दोन व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत यांपैकी एका व्यक्तीच शेत शाळेशेजारी असून पॉजिटिव्ह निघालेला एक रुग्ण काल दुपारनंतर शाळेतील शिक्षकांच्या सोबत लक्षणे असताना गप्पा मारून गेला.

गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतानाही भरवली शाळा
अकोल्यात हनी ट्रॅप, त्या महिलेच्या "लीला" चव्हाट्यावर

आज हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळी 10 ते 1 वाजण्याच्या दरम्यान 8 ते 12 वी शाळा भरवण्यात आली. या गावातील शाळेत शेजारच्या पाच -सहा गावातील तीन वर्गात 60 ते 70 विद्यार्थी हजर होते. शाळेने देखील कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करून पहिल्या दिवशी वर्ग घेण्यात आला. दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गावातील दोघे जण पॉजीटीव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली.

सरपंचांनी याबाबत माहिती कळवली. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना सदर बाबा समजताच मुख्याध्यापक यांना संपर्क साधला त्यात ही बाब मुख्याध्यापक याना माहिती नव्हती याची खातरजमा बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून केली आणि त्यानंतर शाळा सोडून देण्यात आली हा निर्णय मुख्याध्यापक यांचा असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com