लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात

सहा जण गंभीर जखमी
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीप आणि टेम्पोचा भीषण अपघातदीपक क्षीरसागर

लातुर - जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

लातूर - जहीराबाद महामार्गावर केळगाव ते बुजरुकवाडी पाटीच्या दरम्यान निटूरकडे जाण्याच्या दिशेने टेम्पो व जीपचा समोरासमोर अपघात झाला. टेम्पो हा सोयाबीनची गुळी घेऊन केळगावच्या दिशेने जात होता. तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथून लग्नाचे वर्हाड घेऊन निघाली होती. यात जीपचा चुराडा झाला आहे.

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात
मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; 15 लाखांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

यामध्ये जीपमधील पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ १०८ च्या रूग्णवाहिकेला संपर्क साधून बोलावून घेतले. सर्व जखमीला निलंगा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. निटुर पोलीस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे व पो. कॉ. हरी कांबळवाड यांनी पंचनामा करून दोन्ही वाहनांना महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com