पोलीस ठाण्यापर्यंत वरात
पोलीस ठाण्यापर्यंत वरातदीपक क्षीरसागर

लातूर: महिला पोलिसाचा दुर्गावतार; दहशत पसरवणाऱ्या गुंडाची पोलीस ठाण्यापर्यंत वरात !

जिल्ह्यामध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसी खाक्या दाखवत महिला पोलिसाने त्याची रस्त्यावरुन वरात काढली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : जिल्ह्यामध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसी खाक्या दाखवत महिला पोलिसाने त्याची रस्त्यावरुन वरात काढली आहे. दशहत निर्माण करणाऱ्या या गुंडाची अवस्था पोलिसांनी (Latur Police) केल्यामुळे सर्वसामान्य लोक मात्र सुखावले होते. (Latur Latest News)

यावेळी लातूरमध्ये महिला पोलिसाचा (Female Police) रुद्रावतार पाहायला मिळाला आहे. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत त्याची पोलीस स्टेशनपर्यंत (Police Station, Latur) वरात काढली आहे. पोलिसांनी हा गुंड ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची अशी अवस्था केली. महिला पोलिसाच्या या फटक्यांमुळे इतर गुन्हेगारांचेही धाबे आता चांगलेच दणाणले आहेत.

पोलीस ठाण्यापर्यंत वरात
HDFC बँकेत नकली नोटा भरल्याप्रकरणी MIM च्या माजी जिल्हा अध्यक्षास अटक

शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात मागील काही दिवसांपासून गौस मुस्तफा सय्यद हा सराईत गुन्हेगार दशहत निर्माण करत असल्याची माहिती होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात तब्बल १८ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे (Crime) दाखल आहेत. ता. १४ मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीला त्याने मारहाण (Beating) केली होती. तसेच त्या भागात दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर त्या मुलीने विवेकानंद पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली.

विवेकानंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आरोपीच्या शोधात असताना, गौस मुस्तफा सय्यद हा ज्ञानेश्वर नगर भागात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्वरित पोलिसांचे पथक तिथे दाखल झाले. त्याला तिथे ताब्यात घेण्यात आले. परंतु या गुंडाला पोलिसांच्या गाडीतून न नेता रस्त्यावरुन चालवत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्याने या कारवाईत पुढाकार घेतला होता.

आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच तो रस्त्यावर पोलिसांना गयावया करु लागला. तो ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची अशी अवस्था पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी रस्त्यावरुन त्याची काढलेली वरात अनेकांनी पाहिली. मात्र, मोबाईल फोनमध्ये शूट कोणी केलेली नाही.

दरम्यान, दशहत निर्माण करणाऱ्या या गुंडाला महिला पोलिसाने भररस्त्यात फटके दिले. पोलीस स्टेशन गाठले. या सर्व झालेल्या प्रकारावर त्या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अशाप्रकारे कोणी कृत्य करत असेल तर, तात्काळ पोलिसांना कळवा. असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com