Crime News : तलवारी विक्रीसाठी आलेल्या युवकास एलसीबीनं सापळा रचून केली अटक

पाेलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर राेहित घडाघडा बाेलू लागला.
Sangli, Sangli Crime News, Sword
Sangli, Sangli Crime News, Swordsaam tv

Sangli Crime News : सांगली (Sangli) येथील एलसीबीनं नवीन वसाहतीत प्लास्टिकच्या पाेत्यात तलवारी विक्रीसाठी आणल्याप्रकरणी रोहित राजू कुसाळकर या युवकास अटक केली आहे. त्याच्याकडून सहा तलवारी आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रोहित कुसाळकर हा तलवारी व कोयता घेऊन थांबल्याची माहिती एलसीबीचे पोलीस कर्मचारी बिरोबा नरळे यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीनं नवीन वसाहतीजवळ सापळा रचला. ज्या ठिकाणी रोहित थांबला हाेता. तेथे जाऊन त्यास पाेत्यात काय आहे असं पाेलिसांनी विचारलं. त्याने काही नाही असे उत्तर दिलं. पाेलिस त्याला खाेदून खाेदून विचारत हाेते. परंतु ताे उडवाउडवीची उत्तरे देत हाेता.

Sangli, Sangli Crime News, Sword
CWG 2022 : भारतीय खेळाडूंवर अन्याय हाेताेय ? मुरली श्रीशंकरनंतर महिला हॉकी संघासमवेत काय घडलं पाहा

अखेर त्याला पाेलिसी खाक्या दाखवताच ताे घडाघडा बाेलू लागला. पाेत्यातील तलवारी व कोयता कुठून आणला असे त्यास पाेलिसांनी विचारले. परंतु त्यावेळी देखील उडवा उडवीची उत्तरे देत हाेता. राेहित याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.

Edited By : Siddharth Latkar

Sangli, Sangli Crime News, Sword
Gram Panchayat Election Result 2022 : काॅंग्रेस, भाजपास धक्का; बुलढाण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघड्यांची सरशी
Sangli, Sangli Crime News, Sword
Sangli : राष्ट्रवादी पुन्हा ! एनसीपीच्या राेहित पाटलांच्या नेतृत्वाखाली किदरवाडीत भाजपचा सुपडा साफ (व्हिडिओ पाहा)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com