LCB ची मोठी कारवाई; 5 मोटरसायकल, 3 मोबाईल असा लाखोंचा मुद्देमाल जप्त

मागच्या काही काळात लातुरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
LCB ची मोठी कारवाई; 5 मोटरसायकल, 3 मोबाईल असा लाखोंचा मुद्देमाल जप्त
Latur PoliceSaam TV

लातूर: जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाल्यानं याबाबत लातुर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली यानुसार पथके स्थापन करण्यात आले याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, पोलीस ठाणे एम आय डी सी येथे गुन्हा दाखल असलेली मोटारसायकल बाभळगाव चौकात उभी आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ बाबळगाव चौकात पोचून रोडवर मोटरसायकल सह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सुशांत शिवाजी गायकवाड असे असल्याचे सांगितले त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटार सायकल संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटार सायकल काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे.

तसेच लातूर शहरातील व पाखरसांगवी परिसरातून चोरी केल्याचे सांगून त्याच्या आणखीन साथीदारांसह लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखीन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीचे साथीदार महादेव दिलीप समुखराव, कृष्णा गुंडेराव लोंढे यांना अतिशय शिताफीने तात्काळ ताब्यात घेऊन त्यांनी लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करून पोलीस ताब्यातील तिन आरोपीकडून चोरीच्या पाच मोटारसायकली, चोरीचे तीन मोबाईल असा एकूण 02 लाख 72 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मोटार सायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.