देशातील प्रमुख नेत्यांनी रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांना वाहिली श्रद्धांजली!

या दुर्दैवी घटनेबद्दल देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, यांच्यासह देशातील सर्वच प्रमुख नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत यांचं निधन
हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत यांचं निधनSaam Tv

तामिळनाडूमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या भीषण अपघातात भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह एकूण १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे देखील निधन झाले आहे. भारताच्या इतिहासातील हि एक दुर्दैवी घटना ठरली आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यानच्या कुन्नूर येथील डोंगराळ भागात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते.

या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने यासंदर्भांत पहिली प्रतिक्रिया देताना जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टरमध्ये होते व त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भारतीय हवाई दलाच्या व रशियन बनावटीच्या या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व लष्कराचे अधिकारी प्रवास करत होते. या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ अपघात झाला आहे.

या दुर्दैवी घटनेबद्दल देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, यांच्यासह देशातील सर्वच प्रमुख नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे.

जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका जी यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाने चिन्हांकित होती. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.

रामनाथ कोविंद (राष्ट्रपती)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे त्यांनी आपल्या ट्विटद्वारे हा शोक व्यक्त केला आहे.

'जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक आणि सच्चा देशभक्त होते. त्यांचे आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती.' असा मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

तसेच भारताचे पहिले CDS म्हणून, जनरल रावत यांनी संरक्षण सुधारणांसह आपल्या सशस्त्र दलांशी संबंधित विविध पैलूंवर काम केले आहे.त्यांचे योगदान देश कधीच विसरणार नाही असही ते म्हणाले आहेत.

तामिळनाडूमध्ये आज झालेल्या एका अत्यंत दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 सशस्त्र दलाच्या जवानांच्या आकस्मिक निधनामुळे खूप दुःख झाले. त्यांचे अकाली निधन हे आपल्या सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.

राजनाथ सिंह (संरक्षण मंत्री)

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. त्यांची कारकीर्द अतिशय सुशोभित होती आणि गेल्या चार दशकांतील त्यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना.

शरद पवार

मी जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. ही एक अभूतपूर्व शोकांतिका आहे आणि या कठीण काळात आम्ही रावत व दुर्घटनेत मृत पावलेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबासोबत आहेत. रावत यांच्यासह प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही मनापासून शोक. या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे.

राहुल गांधी

देशासाठी एक अतिशय दु:खद दिवस आहे कारण आम्ही आमचे CDS, जनरल बिपिन रावत जी यांना एका अत्यंत दुःखद अपघातात गमावले आहे. ते शूर सैनिकांपैकी एक होते, ज्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचे अनुकरणीय योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही. मला खूप वेदना होत आहेत.

अमित शाह (गृहमंत्री)

अतिशय दुःखद, भयंकर आणि अत्यंत वेदनादायक! आम्ही आमचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस जनरल बिपिन रावत जी यांना तामिळनाडूमध्ये एका दुर्दैवी अपघातात गमावले. मनापासून शोक. या प्रचंड आणि कधीही भरून न येणार्‍या नुकसानाबद्दल देश शोक करत आहे.

देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com