Gautami Patil News: 'गौतमीच्या कार्यक्रमासाठी सुट्टी द्या..' अर्ज व्हायरल झाल्यानंतर ST चालकाने सांगितलं वेगळचं सत्य; म्हणाला...

गावात गौतमी पाटील येणार आहे, दोन दिवसांची सुट्टी द्या, असा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Gautami Patil News
Gautami Patil NewsSaamtv

Sangali News: गावात गौतमी पाटील येणार आहे, दोन दिवसांची सुट्टी द्या असा एका एसटी चालकाचा रजेचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हा अर्ज सांगलीच्या तासगाव डेपोतल्या चालाकाचा असल्याचे समोर आले आहे. मात्र आता या संबंधिची एक वेगळीच सत्यता समोर आली आहे.

ज्या नावाने हा अर्ज व्हायरल केला आहे. त्या चालकाने असा कोणताही अर्ज केला नाही, आणि तसा रजेचा अर्ज तासगाव एसटी आगाराकडे करण्यात देखील आला नसल्याचा समोर आले आहे. त्यामुळे हा सगळा खोडसाळपणा असल्याचे समोर आले आहे.

Gautami Patil News
Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर पाेलिसांच्या धडक माेहिमेस प्रारंभ, सांगलीत दाेन युवकांना अटक

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर सांगलीच्या तासगाव (Tasgaon) एसटी डेपोतील चालकाचा रजेचा अर्ज सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या अर्जामध्ये एसटी चालकाने 22 आणि 23 मे रोजी सुट्टी मिळावी असं नमूद केले आहे. ही सुट्टी गावात गौतमी पाटील येणार आहे म्हणून मिळावी असं मजकूर देखील या रजेच्या अर्जावर लिहिण्यात आला आहे.

हा अर्ज व्हायरल झाल्यानंतर सांगलीच्या (Sangali) एसटी प्रशासनापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अर्जावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र आता या संंबंधीत मोठी माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Gautami Patil News
Nanded News: ते घर शेवटचं ठरलं; विजेत्या तारांवर कोसळून २ तरुणांचा जागीच मृत्यू

अज्ञाताकडून खोडसाळपणा....

तासगाव एसटी आगारामध्ये संबंधित नावाचा चालक कार्यरत आहे. मात्र त्या चालकाकडून अशा प्रकारे कोणत्याही रजेचा अर्ज हा दाखल झाला नाही, असे तासगाव एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज व्हायरल होत आहे. त्या चालकाकडूनही या अर्जाबाबत नकार देण्यात आला आहे. अशा प्रकारचा कोणताही अर्ज आपण लिहिला नाही. किंबहुना त्यावरील सही देखील आपली नसल्याचं चालकाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अज्ञाताकडून हा सगळा खोडसाळपणा केल्याची चर्चा आता होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com