Sachin Tendulkar ने नाेटीसीचे उत्तर न दिल्यास..., Bacchu Kadu यांचा प्लॅन तयार (पाहा व्हिडिओ)

Online Gaming Advertisement Issue : आमदार बच्चू कडू यांनी यापुर्वी मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत पत्र लिहिले हाेते.
bachchu Kadu calls out sachin tendulkar : not right for bharat ratna to promote online gaming
bachchu Kadu calls out sachin tendulkar : not right for bharat ratna to promote online gamingSaam tv

- अमर घटारे

Bacchu Kadu News : भारतरत्न पुरस्कार प्राप्त असलेल्यांनी काेणत्या जाहिराती कराव्यात आणि काेणत्या नाही याचे काही निकष आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडून त्याची पायमल्ली हाेत असल्याचा दावा करीत त्यांना कायदेशिर नाेटीस पाठविणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

bachchu Kadu calls out sachin tendulkar : not right for bharat ratna to promote online gaming
Ambabai Temple Kolhapur : करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शनाबाबत पालकमंत्री केसरकरांचा माेठा निर्णय, भाविकांना...

आमदार बच्चू कडू म्हणाले भारतरत्न सचिन तेंडुलकर हे ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करतात. त्यामुळे युवा पिढी अशा खेळांकडे आकर्षित हाेत आहे. पैशापाेटी जाहिरात करणे याेग्य नाही. त्यांनी अशा जाहिराती करु नये अशी आम्ही त्यांना यापुर्वी विनंती केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे युवा वर्ग प्रभावित हाेताे असेही कडू यांनी स्पष्ट केले.

bachchu Kadu calls out sachin tendulkar : not right for bharat ratna to promote online gaming
Loksabha Election 2024: आनंदित झालेल्या शरद पवारांनी शाहू महाराज यांच्या लाेकसभेच्या तिकिटाविषयी स्पष्ट सांगितलं (पाहा व्हिडिओ)

ते म्हणाले सचिन तेंडुलकर यांनी आपणांस काेणताही अभिप्राय दिलेला नाही. त्यामुळे येत्या ३० तारखेला त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाईल. आमच्या वकिलांनी त्याबाबतचा मसुदा तयार केला आहे. त्यानंतर देखील दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com