BIG Breaking : राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी तिसरा उमेदवार जाहीर

शिवाजीराव गर्जे हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.
 Sharad Pawar
Sharad PawarSaam TV

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानपरिषदेचे दोन उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून (NCP) तिसऱ्या उमेदवाराचं नावही जाहीर करण्यात आला आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse), रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यानंतर आता राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवाजीराव गर्जे हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. (NCP Legislative Council Election candidate Latest News)

 Sharad Pawar
मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर

शिवाजीराव गर्जे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे मुंबईचे ऑफिस सांभाळतात, त्यांना विधानपरिषदेचे टिकीट देऊन राष्ट्रवादीने त्यांचा सन्मान केला आहे. विधानपरिषदेसाठी शिवाजीराव गर्जे हे आता राष्ट्रवादीचे तिसरे उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार आहे. थोड्याच वेळापूर्वी गर्जे हे विधानभवानात दाखल झाले आहे. आता काही वेळातच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांचे नाव सुरूवातीला जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवाजीराव गर्जे हे लवकरच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.

 Sharad Pawar
मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट; ११ जुलैला हजर राहण्याचे आदेश

विधान परिषद उमेदवारीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला उतरवायचं, यावर चर्चा झाली. यामध्ये एकनाथ खडसे यांचं नाव प्राधान्यानं पुढे घेण्यात आलं. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा होती.

भाजपकडून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी

दुसरीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यात आता सहावं नाव रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचं जोडण्यात आलं आहे. भाजपने सदाभाऊ खोत यांना आपला सहावा उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.

मित्र पक्षांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने सदाभाऊ खोत यांना सहावा उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच पाचव्या उमेदवाराला मते कमी पडत असताना भाजपने सदाभाऊ खोत यांना निवडणूक मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com