सेना पदाधिका-याच्या अंगणात घुसला बिबट्या; ग्रामस्थ भयभीत

सेना पदाधिका-याच्या अंगणात घुसला बिबट्या; ग्रामस्थ भयभीत
leopard

सिंधुदुर्ग : नाणोस येथील भरवस्तीत बिबट्याने घुसून एका पाळीव कुत्र्याला लक्ष्य केले. ही घटना शिवसेनेचे पदाधिकारी बाबल ठाकूर यांच्या बंगल्याच्या बाहेरील अंगणात घडली. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बाबल ठाकूर यांचे चिंरजीव प्रवीण ठाकूर म्हणाले रात्री दीड वाजता बिबट्या आल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याने कुत्र्यावर हल्ला केला. त्यामुळे कुत्रा घायाळ झाला. या परिसरातील अन्य कुत्र पळून गेली. एका कुत्रा बिबट्याचा भक्ष्यस्थानी पडला.

leopard
Video पहा : काेल्हापूरकरांचा पैसा महापालिका घालतेय पाण्यात?

याच बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून परिसरात उच्छाद मांडला आहे. बिबट्याने leopard वासरावर देखील हल्ला केल्याची माहिती मिळत असून वनविभागाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी हाेत आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com