थरार! बिबट्याच्या जबड्यातून आईने मुलीची केली सुटका

संतप्त ग्रामस्थांनी या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी आणि पाच अन्य कर्मचाऱ्यांना एका घरात डांबले आहे.
थरार! बिबट्याच्या जबड्यातून आईने मुलीची केली सुटका
leopard Saam tv

चंद्रपूर - चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर भागात बिबट्याच्या हल्ल्यात एक तीन वर्षीय मुलगी जखमी झाल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी घटनास्थळी पोचलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याने परिस्थिती चिघळली आहे.

चंद्रपूर (Chandrapur) शहरालगत दुर्गापूर येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत बघायला मिळाली आहे. रात्री 9 च्या सुमारास वॉर्ड क्र. १ मध्ये अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. समोर बिबट्या मुलीला घेऊन जाताना पाहताच मुलीच्या आईने काठीने बिबट्याचा प्रतिकार करत त्याला पळवून लावले. जखमी अवस्थेतील आरक्षा जगजीवन पोप्पलवार हिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त ग्रामस्थांनी या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी आणि पाच अन्य कर्मचाऱ्यांना एका घरात डांबले आहे. 

हे देखील पाहा -

हल्लेखोर वाघ -बिबटे यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय या अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. स्थानिक नागरिकांच्या संतप्त भूमिकेमुळे दुर्गापूर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलीस- वनविभागाचे अधिकारी- महसुली अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान दुर्गापूर परिसरात वाघ बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. मात्र यावर वनविभागाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच नागरिकांनी संतप्त होत वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना डांबले, असे नागरिकांचे मत आहे. वनाधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी वाघ-बिबट जेरबंद केले होते. मात्र त्यानंतरही हा धुमाकूळ सुरूच राहिल्याने संतप्त नागरिकांनी टोकाची भूमिका घेतली आहे.

leopard
'वेलकम शेतकरी गो बॅक कंपनी' राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात राबविणार- बच्चू कडू

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस- वन विभाग व महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे हा तिढा सुटेलही; मात्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा सीमाभाग व कोळसा खाणीचे व्याघ्र अधिवासाचे उत्तम क्षेत्र याला लागून असलेला दुर्गापूरच्या भागात वाघ बिबट्याचे असे हल्ले सातत्याने सुरू राहणार आहेत. यावर वनविभाग कसा तोडगा काढणार, याकडे दुर्गापूरवासियांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.