बालकास ताेंडात पकडून बिबट्याने ठाेकली धूम; आईने केला पाठलाग

या घटनेमुळे ऊस तोडणी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बालकास ताेंडात पकडून बिबट्याने ठाेकली धूम; आईने केला पाठलाग
Breaking News

कराड : कराड तालुक्यात ऊस तोडणी कामगाराच्या दोन वर्षांच्या मुलावर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. येणके येथी ही घटना घडली आहे. आकाश दिगास बिल असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. leopard attacks child nandurbar yenke near karad Breaking News

नंदुरबार जिल्ह्यातील धनगाव तालुक्यातील दिगास कुटुंब गेल्या काही दिवसांपासून कराड तालुक्यात वास्तव्यास आहे. ऊस तोडणी सुरू झाल्यापासून कराड तालुक्यातील अनेक गावांत प्राण्यांवर बिबटे हल्ले करीत आहेत.

Breaking News
'राजमातांनी बाबासाहेबांना शिवशाहीर पदवी बहाल केली हाेती'

ऊस तोडण्यासाठी आलेल्या कुटुंबासोबत आणलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. बालकास तोंडात घेऊन पळणा-या बिबट्याचा आईने पाठलाग केला. परंतु ताेपर्यंत त्याने शेतात धूम ठाेकली हाेती.

शाेधाध केल्यानंतर थाेड्या अंतरावर ग्रामस्थांना बालकाचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली. दरम्यान येणके भागात तातडीने वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी उपयायाेजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे ऊस तोडणी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com