Raigad Crime News: रायगडात बिबट्याच्या नखांची तस्करी; पोलिसांनी सापळा रचत टोळीच्या आवळल्या मुसक्या

Leopard Nails Smuggling: या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून बिबट्याची १० नखं हस्तगत केली आहेत.
Leopard Nails Smuggling
Leopard Nails Smugglingसचिन कदम

सचिन कदम, रायगड

रायगड: वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी (Smuggling) करणाऱ्या एका टोळीच्या वनविभागाने आणि पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रायगड जिल्ह्यात ही धडक कारवाई करण्यात आली आहे. बिबट्याच्या (Leopard) नखांची विक्री करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून बिबट्याची १० नखं हस्तगत केली आहेत. (Raigad Crime News)

हे देखील पाहा -

Leopard Nails Smuggling
Aurangabad : शाळेतून घरी निघालेल्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याची नखं विक्रीसाठी आणली जात असल्याची खबर माणगांव पोलिस आणि वन विभागाला होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या टोळीतील ४ आरोपींकडून बिबट्याची १० नखं हस्तगत करण्यात आली आहेत. माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील कुंभार्ले गावच्या हद्दीत ही संयुक्त कारवाई करण्यात आली. (Leopard Nails Smuggling)

मंगेश लक्ष्मण कुर्मे - वय ४५ वर्ष, नईम शेख - वय ३२ वर्ष हे दोघे आरोपी निजामपूर बोरवाडी येथील रहिवासी आहेत. या दोघांनी बिबट्याची नखे विक्रीकरता आणली होती. तर आरोपीत दत्ता पवार - वय २२ वर्ष आणि मंगेश पवार वय - ३५ वर्ष हे दोघे रोहा येथील रहिवासी असून ते बिबट्याटी नखं खरेदी करण्यासाठी आले होते. पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत या चौघांनाही अटक केली असून या प्रकरणी वन विभाग कार्यालय, माणगांव यांच्यातर्फे अधिक तपास केला जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com