पुरातन शिव मंदिरावर कोसळली वीज !

अमरावती शहरातील अकोली रोड परिसरालगत असलेल्या महादेव नगर मधील पुरातन शिवमंदिराच्या कळसावर वीज पडून मंदिराचे नुकसान झाले आहे.
पुरातन शिव मंदिरावर कोसळली वीज !
पुरातन शिव मंदिरावर कोसळली वीज !अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती : अमरावती शहरात आज सायंकाळच्या सुमारास आलेला मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने शहरातील अकोली रोड परिसरालगत असलेल्या महादेव नगर मधील पुरातन शिवमंदिराच्या कळसावर वीज पडून मंदिराचे नुकसान झाले आहे. Lightning strikes ancient Shiva temple!

हे देखील पहा -

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मंदिराची नुकतीच कळस स्थापना करण्यात आली. कळसावर लावण्यात आलेल्या लाईटच्या खांबाला विजेचा स्पर्श होऊन विज निघून गेली.

पुरातन शिव मंदिरावर कोसळली वीज !
पंकजा मुंडे काढणार नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत

मात्र घटनेमुळे मंदिरातील वीज पुरवठा करणारी वायरिंग पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. तसेच मंदिराचा एक कोपरा थोडासा खचला असल्याची माहिती आहे. दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने याठिकाणी भाविकांची गर्दी नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र पाऊस थांबल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com