फटाक्यांच्या ट्रकवर वीज कोसळली; अख्ख्या ट्रकचा झाला कोळसा (पाहा Video)

फटाक्याच्या ट्रकवर आज पहाटे भर पावसात वीज कोसळल्याने फटाक्यांच्या स्फोटाने ट्रक भस्मसात झाल्याची घटना सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाका परिसरात घडली आहे.
Truck Accident
Truck Accidentभारत नागणे

पंढरपूर : फटाक्याच्या ट्रकवर आज पहाटे भर पावसात वीज कोसळल्याने फटाक्यांच्या स्फोटाने ट्रक भस्मसात झाल्याची घटना सोलापूर-पुणे महामार्गावरील (Solapur-Pune Highway) वरवडे टोल नाका परिसरात घडली आहे. फटाक्याने भरलेला ट्रक पुण्याकडून सोलापूरकडे जात असताना चालत्या ट्रकवर वीज पडली. यामुळे ट्रक मधील फटाके पेटले आणि एका मागोमाग एक फटाक्यांचे स्फोट होऊ लागल्याने पडत्या पावसात ट्रक पेटला आहे.

पहा व्हिडीओ -

या ट्रक चालकाने सावधानता बाळगत ट्रक सोडल्याने जीवितहानी झालेली नाही. मात्र अल्पावधीतच ट्रक पूर्णपणे जाळून राख झाला आहे. या अग्नितांडवामुळे दोन्ही बाजूनी वाहतूक दोन तास थांबली होती. अग्निशमन यंत्रणा, पोलीस, पथके वेळेत दाखल झाली आणि आग विझवल्यावर हायवेच्या वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com