शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीत लाईनमनचा दगडाने ठेचून खुन
शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीत लाईनमनचा दगडाने ठेचून खुनSaamTv

शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीत लाईनमनचा दगडाने ठेचून खुन

शेषराव गजानन पिंपळशेंडे असे घटनेतील मृतकाचे नाव आहेत.

यवतमाळ - जिल्हातील वणी Wani तालुक्यातील शिरपूर Shirpur पोलीस स्टेशन Police Station अंतर्गत येणाऱ्या येनक शेत शिवारात एका लाईनमनचा अज्ञात इसमाने दगडाने ठेचुन निर्घुन खुन Murder केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. शेषराव गजानन पिंपळशेंडे असे घटनेतील मृतकाचे नाव आहेत. मृतक हा महावितरण मध्ये तंत्रज्ञ म्हणुन कार्यरत होता. जंगला मध्ये गुरे चारणाऱ्या गुराखीला एक मृतदेह आढळून आला.

हे देखील पहा -

गुराख्याने येनक येथील पोलीस पाटलांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती शिरपूर पोलिस स्टेशनला दिल्या नंतर घटनास्थळी शिरपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन लुले हजर झाले. मृतकची ओळख पटली असता मृतक हा महावितरणचा तंत्रज्ञ शेषराव पिंपळशेंडे असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करून शिरपूर पोलीस तपास करीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com