नागाने गळ्याला वेटोळा घातलेल्या 'त्या' चिमुकलीचा रुग्णालयात संघर्ष सुरूच
नागाने गळ्याला वेटोळा घातलेल्या 'त्या' चिमुकलीचा रुग्णालयात संघर्ष सुरूचSaam Tv

नागाने गळ्याला वेटोळा घातलेल्या 'त्या' चिमुकलीचा रुग्णालयात संघर्ष सुरूच

तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

सुरेन्द्र रामटेके

वर्धा : सेलू तालुक्यातील बोरखेडी गावातील जिल्हा परिषदेच्या पहिल्या वर्गात शिकणारी सात वर्षाच्या परी पद्माकर गडकरी या छोट्याशा मुलीला मध्य रात्रीला ती झोपेत असताना नागाने Snake तिच्या गळ्यात विळखा घातला होता. जवळजवळ दोन तास ही छोटी मुलगी हालचाल न करता त्या नागाच्या संघर्षात हिमतीने दात देत स्तब्ध राहिली. भयभीत झालेल्या मुलीची हालचाल होताच नागाने दंश केला होता. त्या चिमुकलीला तात्काळ सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

हे देखील पहा-

चिमुकलीच्या आईने सांगितले की, मी माझ्या मुलीची मी दाद देते, माझ्या मुलीने इतका सारं सहन केलं बस आता देवाला हात जोडते की ती लवकर बरी व्हावी. डॉक्टर म्हणतात हाताचे इन्फेक्शन कमी झालं की ती बरी होईल. ती अजूनही गंभीर आहे.

सेलू तालुक्यातील बोरखेडी कला ह्या जंगलव्याप्त गावात आम्ही राहतो. घरची परिस्थिती बेताचीच आहे माझे पती अपंग आहेत. मी घरची करती आहे. मला दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी चौघेही खाली झोपलो होतो. मध्यरात्री अचानक मुलीच्या अंगावरती इतका मोठं साप पाहिलं आणि माझी हिम्मतच हरली. पण माझ्या मुलीची मी दाद देते ती माझ्या मुलीने इतका सारं सहन केलं बस आता देवाला हात जोडतो की ती लवकर बरी व्हावी डॉक्टर म्हणतात. हाताचे इन्फेक्शन कमी झालं की ती बरी होईल. अजून खतऱ्याच्या बाहेर नाही एक दंश सापाने केला होता दोन तास माझ्या मुलीला त्या सापाने त्रास दिला असे मुलीच्या आईने सांगितले.

नागाने गळ्याला वेटोळा घातलेल्या 'त्या' चिमुकलीचा रुग्णालयात संघर्ष सुरूच
अंबरनाथ: रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू!

सेवाग्राम हॉस्पिटलच्या आयसीयू युनिटच्या डॉक्टरांनी सांगितले चार वाजता तिच्या हातावर आम्ही ऑपरेशन करणार आहे. एक बाजू आम्ही कव्हर केली आहे दुसरी बाजू म्हणजे हात कव्हर होत नाही आहे त्यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत हात बरा होत नाही तोपर्यंत ती धोक्याच्या बाहेर आहे असं सांगता येत नाही. कारण तिच्या हातात जे टोकंझिन मेटापॉलिक्स तयार होत आहे. ते तिच्या शरीरात जाऊन तिला धोका करू शकतात असे डॉक्टर म्हणाले. त्यामुळे दोन्ही बाजू पूर्ण बऱ्या होत नाही तोपर्यंत ती धोक्यातच आहे.  

या प्रकरणाबद्दल खासदार रामदास तडस Ramdas Tadas म्हणाले, "आपल्याला साप जरी दिसला तर आपण किती घाबरतो, ती न घाबरता त्या सापा सोबत संघर्ष केल तिच्या संघर्षाला माझा सलाम असे लवकर दुरुस्त व्हावं ही माझी इच्छा आहे". रुग्णालयात मुलीच्या आई सोबत तब्येतीची विचारपूस करत चर्चा केली आणि मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com