Live Chipi Airport: उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे.
Live Chipi Airport: उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण
Live Chipi Airport: उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरणवैदेही काणेकर

वैदेही काणेकर

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. आज दिवस हा कोकणवासियांसाठी खूप मोठा दिवस आहे. कारण सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. आज यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे याचे उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचे एका मंचावर येणे याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

सुभाष देसाई- कोकणवासीयांसाठी हा आनंदाचा क्षण

सुभाष देसाई यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिला बोर्डिंग पास दिला

आदित्य ठाकरे- कोकण जगप्रसिद्ध आहेच. पण जगभरातून लोकं इथं कसे येतील यासाठी काम करणार

ज्योतिरादित्य शिंदे - यांनी कार्यक्रमाला ऑनलाइन हजेरी लावली

बाळासाहेब थोरात- निसर्गानं कोकणाला खूप मोठी देणगी दिली आहे. इथं पर्यटनाला सर्वाधिक वाव मिळेल. कोकणात पर्यटनाला मोठा वाव, रोजगारही उपलब्ध होतील

अजित पवार- जगातून गोव्याला लोक येतात, गोव्या इतकेच तोडीचे समुद्र किनारे कोकणाला लाभले आहेत. कुठलीही गोष्ट एकट्या दुकट्याने होत नसते अजित पवार टोला

रामदास आठवले- या ठिकाणी येणार विकासाची आंधी म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी

Related Stories

No stories found.