पशुधन विकास अधिकारी गेले बेमुदत संपावर

राज्यातील पाच हजाराहून सहाय्यक पशूधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक बेमुदत संपावर गेले आहे.
पशुधन विकास अधिकारी गेले बेमुदत संपावर
पशुधन विकास अधिकारी गेले बेमुदत संपावरदिपक क्षीरसागर

लातूर: राज्यातील पाच हजाराहून सहाय्यक पशूधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक बेमुदत संपावर गेले आहे. विविध ११ मागण्यासाठी गेले पाच महिने हे कर्मचारी विविध आंदोलन करत आहेत. मात्र १ आँगस्टपासून राज्यातील पाच हजार सहाय्यक पशूधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक बेमुदत संपावर आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आलं.

पशुधन विकास अधिकारी गेले बेमुदत संपावर
याला प्रेम म्हणावे कसे... दोन मुलींचे टोकाचे पाऊल!

लातूर जिल्ह्यातील औसा चाकूर यासह लातूर इथं हे बेमुदत आंलोदन सहाय्यक पशूधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक असलेल्या आणि प्रमाणपत्र धारकांना कृत्रिम रेतनसह इतर सेवा देण्याचा अधिकार मिळावा. त्यासाठी पशुवैद्यकाच्या देखरेखीखाली या सेवा देण्याची शासनाची अधिसुचना रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची हि प्रमुख मागणी आहे.

सहाय्यक पशुधन अधिकारी बिराजदार व्ही एच, गायकवाड एसयु, मेटेएयु, भोये ए सी अनिल लसने, जाधव के एच, कठारे, कलवले, धुमाळ बी एस आदी अधिकारी कर्मचारी यांनी बेमुदत आंदोलनाचं हत्यार उपसले आहेत शासनाला वेळोवेळी कामकाज करताना येणाऱ्या अडचणी बाबतीत विनंत्या करून देखील राज्य शासन पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी याच्या अडचणीकडे लक्ष देत नसल्याने आता उपोषणाला सुरुवात केली आहे याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com