kolhapur, nandani, lcb
kolhapur, nandani, lcbsaam tv

Kolhapur News : नांदणीतील खूनाच्या प्रयत्नाचे गुढ LCB ने उकलले, चाैघांना अटक

जयसिंगपूर रेल्वे स्थानकावरून अपहरण केलं हाेते.

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : वैयक्तिक वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने शिरोळ (shirol) तालुक्यातील नांदणी (nandani) येथील तीर्थराज भरतकुमार उपाध्ये या युवकाचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (local crime branch kolhapur) चौघांना अटक (arrests) केली आहे. (Maharashtra News)

kolhapur, nandani, lcb
420 च्या तक्रारीवरुन Gautami Patil म्हणाली, मी तर... (पाहा व्हिडिओ)

एलसीबीने दिलेल्या माहितीनूसार तीर्थराज उपाध्ये आणि संशयित अण्णासो कजयप्पा यांच्यात वैयक्तिक वाद होता. या वादातूनच कजयप्पा यांनी त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने तीर्थराज यांचे चार चाकीतून जयसिंगपूर रेल्वे स्थानकावरून अपहरण केलं.

kolhapur, nandani, lcb
Satara News : मर्यादा पाळा, अन्यथा मला बंधनं झुकागरुन बाेलावं लागेल; शंभूराज देसाईंनी अजित पवारांना ठणकावले (पाहा व्हिडिओ)

त्याला चिकोडी तालुक्यातील नेज गावच्या हद्दीतील फिल्टर जवळ आणून मारहाण करून जखमी केलं. तो मृत झाला असल्याचं समजून त्याला उसाच्या शेतात टाकून सर्व आरोपींनी पलायन केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com