Corona | सांगलीत कोरोना आटोक्यात येईना ! १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला
सांगलीत कोरोना आटोक्यात येईना ! १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला SaamTv

Corona | सांगलीत कोरोना आटोक्यात येईना ! १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

सांगली मध्ये कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येत्या 19 जुलैपर्यंत सात दिवसांचा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

विजय पाटील

सांगली : राज्य शासनाच्या आदेशान्वये कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी दरानुसार राज्यातील जिल्हे १ ते ५ स्तरांमध्ये विभागले आहेत. त्यामुळे सांगली मध्ये कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येत्या 19 जुलैपर्यंत सात दिवसांचा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

हे देखील पहा -

राज्य शासनाच्या आदेशान्वये फक्त RTPCR चाचणी अहवालानुसार कोविड पॉझिटीव्हीटी दर निश्चित करण्याच्या सूचना आहेत. तर 9 जुलै 2021 रोजी संपणाऱ्या आठवड्याचा, सांगली जिल्ह्यातील कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के पेक्षा जास्त आणि 20 टक्के पेक्षा कमी आहे.

सांगलीत कोरोना आटोक्यात येईना ! १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला
सुसाईड नोट व्हाट्सअ‍ॅपवर शेअर करून पोलीस कर्मचारी बेपत्ता !

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधाविषयी निर्णय घेत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लगतच्या दोन आठवड्याचा RTPCR चाचणीचा पॉझिटिव्हिटी दर विचारात घ्यावा असे निर्देश दिलेले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्तर 4 प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास 19 जुलै 2021 रोजीचे पहाटे ५ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com